आरती जरी-मरी तिसा-आई
कृपा करी ।
शरण आलो तुज द्वारी आमचे रक्षण करी ।।१।। आरती..
तळयात वास करुनी भक्ता दृष्टांत
दिला ।
भक्त जन तारावया तिसगावी वास केला ।।२।। आरती..
चैत्र पौर्णिमेसी तुझी पालखी
मिरवती ।
नवस फेडुनीया चरणी वंदन करीती ।।३।। आरती..
आगरी कोळी जन सारे आई तुझीच
लेकरे ।
संकटी तारी त्यांसी तुझ्या कृपेच्या आधारे ।।४।। आरती..
तुच आदीमाया तुच आहे आदी
शक्ती ।
तुझे गुण गावया देई आम्हासी शक्ती ।।५।।
आरती जरी-मरी तिसा-आई कृपा
करी ।
शरण आलो तुज द्वारी आमचे रक्षण करी ।। |