महिमा जरी-मरी मातेचा
Click For Large Image
॥ ॐ तिसाई नमो नम:॥
॥ ॐ जरी मरी नमो नम:॥
भारतवर्षामध्ये अनेक प्रसिध्द तिर्थक्षेत्र आहेत त्यामध्ये नव्यानेच उदयोन्मुख असलेल्या तिर्थक्षेत्राची आपल्याला ओळख करुन देण्यासाठी हा लेख प्रपंच.

मुंबईपासून ५५ ते ६० किलोमीटर अंतरावर ठाणे जिल्हयातील ऐतिहासिक अशा कल्याण नगरीतील तिसगांव नांवाचे लहानसे खेडे आहे. त्या लहानश्या गांवातील तिसाई जरीमरी देवस्थानाचा इतिहास सुमारे २०० वर्षांचा आहे.

जरी मरी माता हे स्वयंभू देवस्थान आहे, जरी मरी माता तिसगांवात प्रकट झाली तो ऐतिहासिक प्रसंग,—— तिसगांवातील गणा गायकवाड नावाचा एक सज्जन ग्रामस्थ आपल्या सवंगडयांसह नेहमीप्रमाणे गुरे चारण्यासाठी गावांजवळील टेकडीवर गेला असता एकाएकी वादळ सुटले, सर्व गुरे व गुराखी एकत्र जमा झाले यांत गणा गायकवाड ही होता. वादळाच्या सोसाटयाच्या वा-याबरोबर गणाच्या कानावर ध्वनीचा निनाद झाला ''गणा मी देवी आदिमाया शक्ती तुझ्याशी बोलत आहे मी गावांजवळील तळयाच्या मध्यभागी पाषाण स्वरुपात आहे मला वर काढ व माझी स्थापना कर''. साधाभोळा गणा, त्यास काही समजेना त्याने आपल्या सवंगडयांना ही गोष्ट सांगितली व सर्वांनी मिळून गावांत जावून सदर घटना गावांतील प्रतिष्ठित व्यक्तींना सांगितली. या विषयावर गावक-यांची बैठक होऊन गणा म्हणतोय तर शोध घेण्यास काहीच हरकत नाही असे ठरले. मोठया उत्साहाने दुस-या दिवशी सर्व ग्रामस्थ गावांजवळील तळयांत देवीचा शोध घेण्यासाठी उतरले या शोध घेणा-यांमध्ये गणासुध्दा होता एखादा चित्रपट पहावा त्याप्रमाणे गणाच्या डोळयासमोर तलावांत असलेली देवी दिसत होती. वादळांत ऐकलेले शब्द पुन्हा पुन्हा गणाच्या कानावर आदळत होते झोपेत चालणा-या माणसांप्रमाणे गणा चालत होता व तळयाच्या मध्यभागी जाऊन त्याने तलावांत बुडी मारली, गणा पाण्यातून वर आला तो पाषाण स्वरुपातील देवीची मूर्ती घेऊनच. मूर्ती पाहून सर्वच गावक-यांना आश्चर्य वाटले व आनंद झाला व त्यांचे तोंडातून उस्फूर्तपणे देवीच्या नावाचा जयजयकार झाला आजूबाजूस सर्व खारे पाणी असताना ज्या ठिकाणी देवीची मूर्ती सापडली त्या ठिकाणचे पाणी मात्र गोड आहे व ही परिस्थिती आजही तशीच आहे.

देवादिकही ज्या आदिमाया शक्ती अंबा मातेला शरण जाऊन आपली अडचण सोडवितात अशी ही आदिमाया शक्ती जरी मरी मातेच्या रुपाने तिसगांवात तलावांतून प्रगट झाली.

ही बातमी वा-यासारखी पंचक्रोशीतील गावक-यांना समजल्यावर तिसगांवमध्ये लांबून लांबून लोक दर्शनासाठी येऊ लागले. त्यामुळे तिसगांवमध्ये यात्रेचे स्वरुप आले. सर्व गांवकरी घडलेली हकीकत मोठया आनंदाने लोकांना सांगत होते.

सर्व गांवक-यांनी विचार करुन एका शुभदिनी देवीची स्थापना केली व एक लहानसे कौलारु मंदिर उभारले त्या दिवसापासून गणा गायकवाड गणा भगत म्हणून प्रसिध्दीस आला.

हळूहळू जरीमरी देवस्थानाचा महिमा सर्वदूर पसरु लागला. मुंबई, रायगड, रत्नागिरी, नाशिक, धुळे, पुणे एवढेच काय महाराष्ट्राच्या बाहेरील इतर राज्यातूनही सर्व समाजाचे भाविक देवीचे दर्शनासाठी तिसगांवात येऊ लागले. भक्तिभावाने आपली गा-हाणी देवीला सांगु लागले देवीही नवसाला पावू लागली. तिसाची आई जरीमरी माता नवसाला पावणारी व संकटकाळी धावून येणारी भक्तांचे श्रध्दास्थान बनली.

निसर्ग नियमाप्रमाणे गणा भगत यांचा मृत्यू झाला व गावक-यांपुढे देवीचा नवीन पुजारी कोणाला ठेवावा हे ठरविणे अवघड होऊन गेले.

एकाएकी चमत्कार झाला राघो गायकवाड नावाचा तिसगांव पाडयावर राहणारा तिसगांवचाच रहिवाशी ग्रामस्थांकडे आला व त्याने सांगितले ''माझ्या शरीरामध्ये देवीचा संचार झाला असून मला देवीने भगत म्हणून राहण्याची आज्ञा केली आहे''. यावर ग्रामस्थांनी अविश्वास व्यक्त करुन त्याची परीक्षा घेण्याचे सर्वानुमते ठरविण्यात आले. त्यासाठी पंच मंडळींची नियुक्ती करण्यात आली व पंचांनी एक योजना तयार करुन तिला मूर्त स्वरुप दिले गेले. योजना अशी होती.....

गावांतील सर्व मंडळी रात्री ७ वाजता तिसगांव येथील श्री. बाळाराम अर्जुन गायकवाड यांच्या घरासमोरील तुळशी वृंदावनाजवळ एकत्र जमली त्या ठिकाणी राघो गायकवाड यांस बोलविण्यात आले. पंच मंडळींनी अगोदरच पाच रंगाची फुले त्याठिकाणी आणून ठेवली होती. ती फुले सर्वासमोर पंच मंडळींनी बाजूला नेली व आपसांमध्ये ठरवून त्यातील एक फूल कोणासही न सांगता निश्चित केले. ही पाचही फुले राघो गायकवाड याचे समोर ठेवून त्यांस सांगितले की, ''आम्ही या पाच फुलांपैकी एक फुल तू भगत असल्याची निशाणी म्हणून ठेवले आहे, जर तू ते फूल अचूक उचललेस तर आम्ही तुझा भगत म्हणून स्विकार करु'' राघो गायकवाड याने डोळे मिटून देवीचे स्मरण केले, अंगात एखादया अद्‌भुत शक्तीचा संचार झाल्याप्रमाणे तो थरथरु लागला व जरी मरी मातेचा जयजयकार करीत त्याने एक फुल उचलून पंच मंडळींच्या हातात दिले पंच मंडळींनी निश्चित केलेलेच ते फुल होते.

सर्वत्र जयजयकार झाला गुलाल उधळण्यांत आला या जयजयकारांतच राघो गायकवाड याने उंच आरोळी ठोकून मंदिराच्या दिशने धावण्यांस सुरुवात केली काय प्रकार आहे हे पहाण्यासाठी गांवकरीही राघो गायकवाड पाठोपाठ मंदिराच्या दिशेने धावत सुटले. सायंकाळी कुलुप बंद केलेले मंदिराचे दरवाजे आपोआप उघडले जावून आतमध्ये नमस्कार करीत असलेला राघो गायकवाड ग्रामस्थांना दिसला. चावीशिवाय मंदिराचे कुलुप दरवाजे कसे उघडले गेले याचे सर्व ग्रामस्थांना आश्चर्य वाटले सर्व गावक-यांनी एकमुखाने राघो भगताचा जयजयकार केला. अशा पध्दतीने देवीचा भगत नेमण्याची प्रथा पडली व ती आजतागायत चालू आहे.

राघो भगत बरोबरच रामा भगत नंतर पांडु भगत व धर्मा भगत हे देवीचे भगत झाले. परंपरेने आज श्री बेमटया भगत व वसंत भगत देवीची सेवा करीत आहेत.

जरी-मरी माता हे जागृत व नवसाला पावणारे देवस्थान असल्याने या परिसरांतील तसेच इतर जिल्हयातील भाविकांची देवीवर नितांत श्रध्दा आहे. मातेच्या मंदिराच्या मध्ये जाऊन आपल्या अडीअडचणीचे गा-हाणे सांगितले की अडचणीत असलेल्या भक्तांची अडचण दूर होतेच असा दृढ विश्वास येथील नागरिकांचा आहे. अश्या या जरी मरी मातेच्या छत्राखाली सामान्य शेतकरी, मच्छीमारी करणारे कष्टकरी, गांवकरी आज गेल्या २५ ते ३० वर्षामध्ये बांधकाम व्यवसाय, ट्रान्सपोर्ट व्यवसाय, कारखानदारी, शिक्षण क्षेत्र, शेती व्यवसाय, मत्स्य व्यवसाय, केबल नेटवर्क, हॉटेल व्यवसाय अशा वेगवेगळया क्षेत्रांमध्ये नांव कमवून सचोटीने व्यवहार करुन आपापल्या व्यवसायातील मातब्बर व्यावसायिक म्हणून ओळखले जातांत. त्यामध्ये प्रामुख्याने उद्योगपती श्री भगवानशेठ आ.भोईर, श्री वसंतराव ह.सुर्यवंशी गुरुजी, श्री अनंता शेठ गवळी, श्री नामदेवशेठ आ.भोईर, श्री गणपतशेठ काळू गायकवाड, श्री संजय अनंता गायकवाड, श्री मनोज राय, श्री रामकाका रघुनाथ गायकवाड, श्री चंद्रकांत श.भोईर, उरणचे श्री नामदेव रामा भोईर अशी अनेक मंडळी ­ जरी मरी मातेच्या कृपार्शिवादाने नांव लौकिक मिळवून मोठी झाली आहेत. याची या मंडळींना जाणीव असून आपल्या उत्पन्नातून सतत समाजोपयोगी कार्य करीत असतात.
 
 
 
   
Click For Large Images
prom dresses 2016 prom dresses 2016 prom dresses 2016 prom dresses 2016 prom dresses 2016 sherri hill sale prom dresses 2016 blush dresses sale cheap la femme dresses sherri hill sale sherri hill sale prom dresses 2016