जरीमरी
सेवा मंडळ
(रजि. क्र. महा/४६०/९५/ठाणे)
|
श्री. भगवानशेठ आत्माराम भोईर
अध्यक्ष |
श्री. वसंतराव हरीशचंद्र सुर्यवंशी (गुरूजी)
कार्याध्यक्ष |
श्री. चंद्रकांत शनिवार भोईर
उपाध्यक्ष |
श्री. एकनाथ अर्जुन गायकवाड
उपाध्यक्ष |
श्री. पंडित आत्माराम भोईर
खजिनदार |
श्री. दत्ता मोतिराम गायकवाड
सचिव |
श्री. नरेंद्र नारायण सूर्यवंशी
सहसचिव |
श्री. शंकर गुलाम गायकवाड |
|
जरीमरी मंदिराचे
जुने ट्रस्टी जरीमरी मातेचे मंदिराचे
स्वरूप झोपडीसारखे असल्याने, प्रथम त्या ठिकाणी ग्रामस्थांनी कौलारु
मंदिर निर्माण केले, त्यानंतर श्रध्दाळूंची वाढती संख्या पाहून
१९५२ साली कल्याण पश्चिम येथील सुप्रसिध्द समाजसेवक श्री. बापूसाहेब
ओक व त्यांचे तिसगांवातील सहकारी यांनी एक कमिटी बनवून मंदिराचा
प्रथम जिर्णोध्दार केला व बांधकामाचे सुंदर असे मंदिर बांधले पुढे
तीच कमिटी मंदिराचे ट्रस्ट म्हणून काम करू लागली. या कमिटीमध्ये
खालील मान्यवरांचा ट्रस्टी म्हणून समावेश होता. |
(१) माधव प्रभाकर
ओक
(२) जानू काळू पाटील
(३) महादू गोविंद पाटील
(४) दगडू आप्पा पाटील |
जरी
मरी सेवा मंडळाचे कार्य - जरी
मरी सेवा मंडळाची स्थापना सन १९७३ साली श्री. भगवानशेठ भोईर, श्री.
वसंतराव सूर्यवंशी गुरूजी, श्री. चंद्रकांत श. भोईर व इतर यांचे
पुढाकाराने झाली तेव्हापासून या सर्वांचे नेतृत्वाखाली जरी मरी
सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी व सदस्य विविध उपक्रम राबवित आहेत.
जरी मरी सेवा मंडळाचे पदाधिकारी, सदस्य, हितचिंतक व आधारस्तंभ
असे १०० हून अधिक कार्यकर्ते अस्तित्वात आहेत. गेल्या ३२ वर्षांमध्ये
वेगवेगळया क्षेत्रांमध्ये जरी मरी सेवा मंडळाने कार्य केले आहे. |